Posts

Showing posts from September, 2020

क्षमा

Image
                                      नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवस भर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.  शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या ...

हरवले ते गवसले कां ?

  हरवले ते गवसले कां ? बरीच वर्षे झाली या घटनेला. पण अजूनही तो दिवस आठवला की अंगावर कांटा येतो. मी बहुतेक नववीत होतो तेव्हां. माझ्या वडलांची चुलत....चुलत बहिण दादरला राहत होती. तशी लांबची असली, तरी त्या काळी सर्व नातीगोती श्रद्धेने जपली जात. आमच्याकडे गोरेगांवला एक गृहस्थ घरी केसांसाठी आयुर्वेदिक औषधी तेल बनवीत. माझी  आत्या त्यांनी बनवलेली औषधी तेलं वापरत असे.  ‘त्या’ दिवशी त्या गृहस्थाकडून तेलाचा मोठा शिसा घेऊन तो आत्याकडे दादरला पोंचवण्याची जबाबदारी मला देण्यांत आली होती. त्याप्रमाणे मी आत्याकडे गेलो व तिला तो तेलाचा शिसा दिला. “किती झाले रे ?” आत्याचा नेहमीचा प्रश्न आला. “पैशाविषयी कांही बोलू नकोस, असं काका म्हणालेत. बरं मी निघू ?” मी विचारले.  “अरे थांब. चहा तरी घे.” मी मानेनेच ‘मला चहा नको’ अशी खूण केली. “बरं मग करंजी तरी खा” आत्याने आग्रह केला. मी करंजी-मोदकाला नाही म्हणणं, म्हणजे बगळ्याने माशाकडे पाठ फिरवण्यासारखे होते. मी तब्येतीत दोन करंज्या हाणल्या. तेवढ्यांत आत्याची मुलगी...मी तिला बेबीताई म्हणायचो ती एक पिशवी घेऊन समोर आली. अरे हो ! या बेबीताईविषयी सांगाय...